NGN News
Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस हायस्कूल, तिडके कॉलनी येथे वार्षिक गुणगौरव सोहळा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2025–26 मधील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा वार्षिक गुणगौरव पुरस्कार सोहळा शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेल्या या सोहळ्याने उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. पाहुण्यांना सन्मानचिन्ह व वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भाषण, नृत्य, वाद्यवृंद आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे कार्यक्रम रंगतदार केला. यानंतर पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शिमला फुड्सच्या संचालिका सौ. शिवानी खाडे, वी मार्च डायरेक्टर सौ. आरती कोठारी, सौ. राधा नागरे तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. पूर्वी मेहता, सौ. राजश्री तिवारी व कु. साक्षी बेदाडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे चेअरमन डॉ. ए. एफ. पिंटो, संचालिका ग्रेस पिंटो, मुख्याध्यापक श्री. संजय पाटील, परिवेक्षिका गुरमीत शेटे, आयडिया फर्नांडिस तसेच क्रीडा शिक्षक, कला शिक्षक व महिला शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण व राष्ट्रगीताने करण्यात आली. या सोहळ्यास पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

Comments are closed.