NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

खामखेडा चौफुली येथे संतप्त शेतकऱ्यांकडून पुतळा दहन करून निषेध

0

देवळा/ महेश शिरोरे

देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुली येथे कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याबद्दल खामखेडा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा पुतळा दहन करत जाहीर निषेध व्यक्त केला.

कांदा भाव वाढ रोखण्यासाठी केंद्राने शनिवारी 31 डिसेंबर पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केले.सप्टेंबर मध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने 31 डिसेंबर पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले असून ,कांद्याच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार असल्याने त्वरित हा निर्णय मागे न घेतल्यास कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या विरोधात जाण्याच्या मन:स्थितीत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील व देशातील कांदा उत्पादक शेतकरी  हतबल झाला असून तो पूर्णतः खचला आहे .शासनाचा हा निर्णय म्हणजे कांद्याची अघोषित निर्यातबंदीच असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी गणेश शेवाळे या शेतकऱ्यांनी  केला आहे.

 हे सरकार मात्र आता शेतकऱ्याला जगू देणार नसल्याचे खामखेडा चौफुली येथे  शेतकऱ्यांच्या जन आक्रोश प्रंसगी प्रत्येक शेतकऱ्याच्या मुखातून सरकारच्या या नाचक्की धोरणा बद्दल शेतकरी आक्रमक पवित्रा घेऊन आक्रोश करत असल्याचे प्रशांत शेवाळे हे म्हणाले .शेतकऱ्याच्या हक्काच्या, कष्टाच्या मालाला आता कुठे दोन पैसे मिळण्याची वेळ आली ,त्यातच या आत्मघातकी सरकारने मात्र शेतकरी उभे राहण्याच्या आताच कांद्यावर  निर्यात शुल्क लागू करून जणू काही  त्याच्या कंबरेत कुऱ्हाड टाकली आणि शेतकऱ्याला होत्याचे नव्हते करून टाकले.थोड्या फार प्रमाणात कांदा विकला जात असल्यानं तो कुठे नोकरदार वर्गाला सहन होत तर केंद्र सरकारने नोकरदारांच्या पगार कमी करून दाखवावेत असे आप्पाजी शेवाळे या शेतकऱ्यांनी व्यक्त करून केंद्र सरकारबद्दल  निषेध व्यक्त केला.

प्रत्येक मार्केट कमिटी मधील व्यापाऱ्यांनी त्यांची एकजूट असल्यामुळे मार्केट बेमुदत  बंद केले .आणि स्वतच्या खरेदी केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा  .म्हंजे प्रत्येक व्यक्ती शेतकऱ्यांच्या उरावर येऊन बसला.व्यापाऱ्यांनी मात्र जो पर्यंत मार्केट बंद आहेत तो पर्यंत त्यांच्या घेतलेला कांदा माल विक्री साठी  देखील  बाहेरील बाजारात जाऊ देऊ नये .तरच. व्यापारी शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचे सिद्ध होईल .असेही यावेळी संतप्त शेतकरी केंद्र सरकारचा प्रतीकात्मक पुतळा दहन   प्रसंगी शेतकरी बोलत होते. यावेळी गणेश शेवाळे, प्रशांत शेवाळे, जितेंद्र शेवाळे, शेखर बोरसे, प्रभाकर शेवाळे, बंटी शेवाळे, सचिन मोरे, संदीप शेवाळे, आबा शिंदे, दत्ता शेवाळे, आप्पाजी शेवाळे, उत्तम शेवाळे, अनिल शिवले, दीपक शेवाळे, वसंत शेवाळे आदिंसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.