माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थानच्या दानपेट्यातील रकमेची मोजदाद मंदिर कर्मचारी अथवा इतरांकडून न होता ती बँक कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी संस्थानच्या माजी विश्वस्त ललिता संदीप शिंदे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, अशाच प्रकारचे निवेदन त्यांनी सहधर्मदाय आयुक्तांना देखील दिले.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनाचा आशय असा : त्र्यंबकेश्वर हे देशातील महत्वपूर्ण धार्मिक स्थळ असल्याने दिवसेंदिवस येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. स्वाभाविकच, येणारे भाविक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधीच्या दर्शनाला देखील येत असल्याने दानपेटीत मोठ्या प्रमाणावर रक्कम संकलित होते. या पार्श्वभूमीवर संस्थानच्या दानपेट्यातील रकमेची मोजदाद मंदिर कर्मचारी अथवा इतरांकडून न करता ती बँक कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येऊन संस्थानच्या कारभारात पारदर्शकता आणली जावी. संस्थांनचे सर्व विश्वस्त स्थानिक नसल्याने रक्कम मोजदादप्रसंगी ते उपस्थित नसतात. त्यामुळे त्रयस्थ व्यवस्था म्हणून बँक कर्मचारी रकमेची मोजदाद चांगल्या आणि पारदर्शीपणे करू शकतील.
Comments are closed.