NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाशकात सतर्कता ! समाज माध्यमातून तेढ वाढवणे पडणार महागात..

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

राज्यातील काही शहरांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील नागरिकांना फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस अप, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांतून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणारे, अवमानकारक, सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश, छायाचित्र प्रसारित करू नये, असे केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दानिश मन्सुरी यांनी सामाजिक सलोखा धोक्यात येईल किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर समाज माध्यमात टाकू नये, तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे. ज्यात काही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांवरून जातीय तेढ, तणाव, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले असतांना समाज माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पाठवून तणाव वाढवला जात आहे. मन्सुरी यांनी सामाजिक सलोखा धोक्यात येईल किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर समाज माध्यमात टाकू नये, तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.