मुंबई/एनजीएन नेटवर्क
मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांनी संघटनेतील कोणतेही पद देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांची संघटनेतील कोणतेही पद देण्याची पक्षाकडे मागणी केली. संघटनेत कोणतेही पद द्या, पदाला न्याय देईन, असे अजित पवार म्हणाले. जयंत पाटील मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी 3 वर्षांनंतर पद बदलण्याची पक्षाच्या घटनेत तरतूद आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.