नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शरद पवारांऐवजी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाणांचे फोटो बॅनरवर वापरायला सुरुवात केली आहे. बॅनरवरुन शरद पवार गायब आहेत, त्या जागी यशवंतराव झळकताना दिसतायत. अजित पवार गटाला शरद पवारांनी आपले फोटो बॅनरवर वापरु नये अशी तंबी दिली होती. त्यानंतर चक्क नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या होर्डींग्सवर पवारांऐवजी यशवंतरावांचे फोटो दिसून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान लावलेल्या स्वागत फलकावर यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरत पवारांना शह देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न दिसून आला. दरम्यान, अजित पवार गटाच्या या खेळीवर शरद पवार गटाने टीकास्त्र सोडले आहे. पण पवारांना डावलून यशवंतरावांचा फोटो वापरण्यात आल्याने अजित पवार गटाच्या या खेळीची चर्चा होते