अन्बलगन, वेलारासू, कुशवाह यांची असणार उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासन तसेच अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.21 ऑगस्ट रोजी हॉटेल ट्रीट( गोविंदनगर) येथे सकाळी 11 वाजता आयमा इंडेक्स 2025 गुंतवणूक महाकुंभ लॉन्चिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी दिली.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उद्योग सचिव पी. अन्बलगन तर अतिथी म्हणून उद्योग (विकास)आयुक्त दीपेंद्रसिंह कुशावाह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू,विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनिषा खत्री,एचएएल नाशिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी उपस्थित राहतील.
आयमा इंडेक्स-२५ गुंतवणूक महाकुंभचे स्वरूप तसेच स्टॉल्सबाबतची माहिती दिली जाईल.देश- विदेशातून या इंडेक्स मध्ये उद्योजकांचे स्टॉल्स असतील, असे आयमा सरचिटणीस प्रमोद वाघ व आयमा इंडेक्स २५ महाकुंभ चेअरमन वरून तलवार यांनी सांगितले
Comments are closed.