नाशिक/एनजीएन नेटवर्क
यंदाच्या पावसाळी हंगामात नाशिक व सभोवतालच्या परिसरात ‘कंजंक्टिवाइटिस’च्या केसेसमध्ये वाढ झालेली असून, या डोळ्यांच्या अत्यंत धोकादायक संसर्गाबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. ‘कंजंक्टिवाइटिस’ला सामान्यतः ‘पिंक आय’ म्हणून ओळखले जाते. यामध्ये डोळ्यातील पांढरा भाग व आतमधील भागात विषाणूचा संसर्ग होत असतो. सामाजिक पातळीवर हा संसर्क झपाट्याने वाढण्याची भिती व्यक्त करतांना यासंदर्भात सावधगिरी व सामाजात जागृकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पिटलतर्फे तज्ज्ञांनी कळविले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी ‘कंजंक्टिवाइटिस’चा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत १२ ते १५ टक्के वाढ झालेली आहे. बाह्य रुग्ण विभागास दैनंदिन भेट देणार्या रुग्णांपैकी १५ टक्के रुग्णांमध्ये ‘कंजंक्टिवाइटिस’ विषयक लक्षणे आढळून येत असून, त्यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात संसर्गाचा धोका असतो.
पावसाळी हंगामात हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण अधिक असते. असे वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरत असून, ‘कंजंक्टिवाइटिस’चा प्रसारदेखील या कालावधीत झपाट्याने होत असून, यामुळे डोळे येण्याची साथ पसरली आहे. पाणी साठत असलेल्या ठिकाणी तसेच अस्वच्छ असलेल्या भागात, दाट वसती असलेल्या झोपडपट्टीसारख्या क्षेत्रांमध्ये संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात असतो. लहान मुले, कुटुंबातील सदस्य आणि आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी यांच्यात ३० ते ४० टक्के जणांना संसर्गाचा धोका असतो. ‘कंजंक्टिवाइटिस’चे उच्चाटन करण्यासाठी साध्या व सोप्या कार्यपद्धती अवलंबण्याची आवश्यकता आहे. यामध्ये नियमितपणे साबणाने हात व चेहरा धुणे, डोळ्यांना वारंवार स्पर्श न करणे किंवा डोळे न चोळणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेणे, तसेच वैयक्तिक पातळीवर स्वच्छतेवर भर देणे. पालकांनी आपल्या पाल्यांना नियमितपणे हात धुण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. आपण सर्व मिळून या विषाणूचा पराभव करुन डोळ्यांच्या साथीला अटकाव करु शकतो, असे मत डॉ. शरद पाटील, मेडिकल डायरेक्टर, सुशील आय केअर, युनिट ऑफ डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पिटल नाशिक. यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले, शाळा किंवा कामांच्या ठिकाणांवर ‘कंजंक्टिवाइटिस’च्या फैलावाचे ठराविक असे केंद्र अद्यापपर्यंत आढळलेले नाही. परंतु सध्याची नाशिकमधील वातावरणीय परिस्थिती पाहता या विषाणूच्या प्रादुर्भावाचा जलदगतीने फैलाव होण्याचा धोका कायम आहे.
जाणकारांच्या सांगण्यानुसार घरगुती उपाय करणारे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे तसेच वैयक्तिक पातळीवर उपचार घेणारे यांच्यात ‘कंजंक्टिवाइटिस’मुळे गंभीर स्वरुपाचे आजार जडण्याचा धोका अधिक प्रमाणात वाढलेला आहे. विविध प्रकारची गुंतागुंत टाळण्यासाठी लक्षणे आढळल्यानंतर नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले जाते आहे.
‘कंजंक्टिवाइटिस’ या विषाणूच्या प्रसाराबाबत रुग्णांमध्ये सजगता निर्माण करणे आवश्यक आहे. फिजिशियन आणि नेत्रविकार तज्ज्ञ यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्या माध्यमातून सार्वजनिक पातळीवर जनजागृती करतांना लक्षणे आढळल्यावर रुग्णांना वेळीच उपचार घेण्यास प्रोत्साहित करत संभाव्य धोके टाळले जाता आहेत.
‘कंजंक्टिवाइटिस’च्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी बचावात्मक उपाययोजनांचे प्राधान्याने पालन करणे आवश्यक आहे. नियमितपणे चेहरा धुणे, डोळ्यांना सातत्याने स्पर्श करण्याचे टाळण्यासह स्वच्छतेशी निगडीत सवयींचा अंगीकार करणे त्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच पालकांनी त्यांच्या पाल्यांना नियमित हात स्वच्छ धुण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच आपला हातरुमाल किंवा अन्य वैयक्तिक वस्तू इतरांना, मित्रांसोबत आदान-प्रदान करण्याचे टाळणेही आवश्यक असल्याचे डॉ.शरद पाटील, मेडिकल डायरेक्टर, सुशिल आय केअर अ युनिट ऑफ डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पिटल, नाशिक यांनी सांगितले.
‘कंजंक्टिवाइटिस’च्या प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की बचावात्मक उपाययोजनांचा खबरदारीने अवलंब करावा. लक्षणे आढळल्यास विलंब न करता वेळेत नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ‘कंजंक्टिवाइटिस’ विषयक जागृकता निर्माण करण्यासह स्वच्छ राहाणीमानासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे.
डॉ.अग्रवाल्स हॉस्पिटलविषयी..
डॉ.अग्रवाल्स आय हॉसिपटल, हे भारतातील सर्वात मोठे साखळी आय हॉस्पिटल आहे. त्यांच्या माध्यमातून नेत्रविकारांशी निगडीत आरोग्य सुविधा एका छताखाली उपलब्ध करुन दिल्या आहेत. हॉस्पिटलची स्थापना १९५७ साली झालेली असून, ६६ वर्षांची प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा व आधुनिक उपचार पद्धती या हॉस्पिटलद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. १० देशांमध्ये एकूण १५० हून अधिक हॉस्पिटल कार्यरत असून, भारत व आफ्रिका येथील हॉस्पिटल्समध्ये ५०० हून अधिक नेत्रविकार तज्ज्ञ रुग्ण सेवा देत आहेत. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या http://www.dragarwal.com