नाशिक/एनजीएन नेटवर्क
महिला सक्षमीकरण व सांस्कृतिक सामाजिकता जपणाऱ्या नाशिक येथील नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सह पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा महात्मा फुले हॉल गोविंद नगर येथे दुपारी दोन वाजता संस्थेच्या संस्थापक चेअरमन डॉ. अश्विनीताई बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेची सुरुवात दीप प्रज्वलन करून प्रार्थना करण्यात आली. सभेस प्रमुख अतिथी म्हणून कायदेशीर सल्लागार संजय लेंडे, योग गुरू संगु गुरुजी, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, डॉ. सुरेखाताई कुलकर्णी उपस्थित होते. या वर्षात दिवगंतानां श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात केली. मान्यवरांच्या शुभहस्ते बचत गटाचे काम करत असताना एक आदर्श अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष यांची भूमिका कशी बजवावी व तसेच आपल्या बचत गटाचे बचत ही कशी वाढवावी आणि बचत गटाचा कारभार कसा सांभाळावा या संदर्भात ज्यांनी हे प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले त्या यशस्वी 25 महिला बचत गटांना अनुक्रमे नारायणी गट ,शांभवी गट, गुरु सावली गट,शकुंतला गट, वृंदावनी गट, इच्छाशक्ती गट, ध्येय शिखर गट, अंकिता गट,राधिका गट, स्वामीज्ञानामृत गट, आभूषण गट, शिवसखी गट, निवेदिता गट ,शुभ लाभ गट ,पर्वणी गट, प्रयास गट, प्रयास सखी, दीप शक्ति गट, ऋतुजा गट बिजासनी गट,यांना *स्वंयसिद्धा प्रमाणपत्र* दिले. नियमित कर्ज फेडणारे सभासद अनुक्रमे कमल आकुल, संगीता मोटमल,गायत्री शिरापुरे, संगीता साळवे, रजनी अमृतकर , तसेच गटसंघटिका अनुक्रमे मीनाक्षी शिंदे, मंजुसाध, स्वाती सूर्यवंशी, मीना मोरे , अल्पबचत प्रतिनिधी मीनल विश्वंभर आशा गवळी ,आदर्श बचतगटाच्या महिलांचा अनुक्रमे श्रमपुंजी गट व्यंकटेश गट जिद्द गट अमृतवेल कस्तुरी गट श्रीकृपा गट अनमोल गट सिद्धी का गट व कर्मचारी संस्थेच्या व्यवस्थापिका शितल महाजन, दिपाली मुकणे ,स्नेहल सौचे ,सोनाली भारस्कर व सतीश साळवे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मनोगत संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी अशोक बोरस्ते यांनी सादर करताना गेल्या वीस वर्षापासून सेवाभावाने बचत गटासाठी कार्य करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था असून यात सातत्य ठेवून महिलांच्या आर्थिक अडचणी सोडवणे व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आत्मनिर्भर बनविण्यासाठी यासाठी कार्य करीत आहे. अवघ्या तीस बचत गटापासून झालेली सुरुवात १०४५ बचत गटापर्यंत पोचली आहे व संस्थेचे दीड लाखापासून सुरू केलेले कामकाज आज आठ कोटीच्या घरात पोहोचलेले असल्याचे सांगितले. आगामी काळात संस्था रौप्य महोत्सव साजरा करणार आहे .त्यासाठी बदलते तंत्रज्ञान ,नेट बँकिंग, सहकार कायदा नियमक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आदर्शवत प्रगती करेल. नवीन नवीन योजना सभासदांसाठी राबविल्या जातील असे प्रतिपादन अध्यक्षांनी केले.
सुरेश पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीला सहितिक भाषेत शुभेच्छा दिल्या .वृक्ष संवर्धन आणि माणुसकीचा मंत्र देत सुखी आणि समाधानी आयुष्य जगण्याबाबत गिरजा महिला मंच चे व्यासपीठ असेच उभे राहील हा विश्वास व्यक्त केला. योग शिक्षक सगू गुरुजी यांनी महिलांनी आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच आपले मानसिक आरोग्य कसे सुदृढ ठेवले पाहिजे व शारीरिक क्षमता वाढवून आजारापासून दूर राहून आनंदाचे आयुष्य कसं जगता येईल याचे मार्गदर्शन केले.
शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉ. सुरेखाताई कुलकर्णी यांनी ‘महिलांचे व्यक्तिमत्व विकास’ याबाबत मार्गदर्शन करून खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करायचं असेल तर आपल्या गरजा आपण भागवण्यासाठी समृद्ध असले पाहिजे . सबल असलं पाहिजे .शिक्षण घेत असलं राहिलं पाहिजे. स्वतःला प्रशिक्षित करून समाजातले बदल घडामोडी याच्याबाबत अवगत असले पाहिजे. याबाबतीत अगदी सहज आणि सोप्या भाषेत महिलांना मार्गदर्शन केले.
एडवोकेट संजय लेंडे सर यांनी संस्थेच्या एकंदरीत अंतर्गत तपासणी व सहकार तपासणी संदर्भात *अ* वर्ग मिळाल्याबद्दल संस्थेला अभिनंदन केले. गेल्या सहा वर्षापासून सातत्याने *अ* वर्ग मिळवणारी महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही पतसंस्था एक आदर्श म्हणून समाजात कार्यरत आहे यासाठीच्या शुभेच्छा दिल्यात.
यावेळी मागील सभेचे इतिवृत्त संस्थेच्या उपाध्यक्ष रजिया शेख यांनी वाचून कायम केले . तसेच 31 मार्च 2023 ताळेबंद व नफा तोटा पत्रकही संस्थेच्या सचिव एडवोकेट जयश्री दळवी यांनी वाचून त्याची नोंद करण्यात आली. संचालक मंडळाने तयार केलेल्या अहवालाचे वाचन संचालक मंडळ अनुक्रमे सभासदांना सूचना – सौ प्रतिभाताई मस्के, सभासद व भाग भांडवल वाचन – सौ अंजली नेरकर, गंगाजळी व इतर निधी वाचन -सौ सुरेखा महाले, ठेवी व कर्ज व्यवहार वाचन – सौ ज्योतीताई पोराटे, बँक गुंतवणूक व नफा तोटा वाचन-सौ निर्मलाताई सातभाई, सामाजिक उपक्रम वाचन- सौ अनिता शिरोडे, संस्थेच्या विविध योजना-सौ अरूणा लेंडे यांनी करून त्याला मंजुरी देण्यात आली. व संचालक मंडळाने सुचवलेल्या नफा वाटणीस यावेळी मंजुरी देणे, लेखापरीक्षण अहवालाचे वाचन तसेच पुढील वर्षासाठी चा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. आर्थिक वर्षांमध्ये अर्थसंकल्प पेक्षा ज्यादा झालेल्या खर्चास मान्यता देऊन उपविधीमध्ये दुरुस्ती करून भाग भांडवल मर्यादा 25 लाखावरून 50 लाख करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
विशेष सत्कार बागलाण तालुक्याच्या समन्वयक पूजा दंडगव्हाळ तसेच संस्थेचे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम पाहणारे श्री अखिलेश अशोक बोरस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी महिला बचत गट, रजिया हुसेन शेख उपाध्यक्ष, ॲड. जयश्री दळवी, ,ज्योती पोराटे, मीना आढाव, प्रतिभा गाडे, सुरेखा महाले ,निर्मला सातभाई, रजनी वाणी, अंजली नेरकर ,अनिता शिरोडे, अरुणा लेंडे,प्रतिभा म्हस्के आदी संचालक मंडळ उपस्थित होते. आभार प्रतिभा गाडे यांनी मानले.