NGN News
Latest Marathi News

लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामानंतर शहरातील इतर बांधकामेही रडारवर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक महानगरपालिकेने माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व दीपक व भूषण लोंढे यांनी आयटीआय पूरक्षेत्रात नंदिनी नदी किनारी केलेल्या अनधिकृत बांधकामावर गुरुवार (दि. १६) सकाळ पासून हातोडा पाडण्यात आला. अतिक्रमण विभागाने मंगळवारी रात्री लोखंडी होर्डिंगचे बार कटरणे कापत काढले होते. गुरुवारी सकाळी सातपासून मागील बाजूने बांधकाम तोडण्यात सुरवात केली आहे.रात्रीपर्यत इमारत पूर्ण तोडण्यात येणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी ‘धम्मतीर्थ’ या इमारतीच्या ठिकाणी पाहणी केली असता त्याठिकाणी भुयारी मार्ग आढळून आला. त्या ठिकाणी दोन बेडरूमसह कुऱ्हाडी, चाकू आदी अवैध साठा आढळून आल्याने ती इमारत सील करून तीवर कायदेशीर कारवाई बाबतीत नोटीस देण्यात येणार असल्याचे मनपा अतिरिक उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले. परिसरातील झोपडपट्टी आणि इतर घरे अनधिकृत असल्याने, त्यांनाही नोटीस देणार असल्याचे सांगत शहरातील सर्वच अनधिकृत बांधकाम इमारती बाबतीत अहवाल सादर करणार असल्याचे स्पष्ट केल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

यावेळी मनपा अतिरिक उपायुक्त स्मिता झगडे, आयुक्त डॉ. सुनीता नांदुरकर, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे अग्निशमन दल, आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.