नागपूर/एनजीएन नेटवर्क
नागपुरातील एका अजब घटनेची देशभर चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसेच आहे. एक पुरुष प्रेग्नंट झाला आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे हा पुरुष तब्बल 36 वर्षे प्रेग्नंट होता. 9 महिन्यांऐवजी 36 वर्षांच्या प्रेग्नन्सी नंतर त्याने जुळ्यांना जन्म दिला. प्रेग्नन्सीचे हे अजब प्रकरण पाहून डॉक्टरांनाही जबर धक्का बसला.
संजू भगत असं या व्यक्तीचं नाव. लहानपणापासूनच त्याचं पोट सामान्य मुलांपेक्षा वेगळं होतं. ते फुगलेलं होतं. पण त्याच्या कुटुंबाने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण हळूहळू पोट खूपच वाढू लागले. तेव्हा मात्र त्याच्या कुटुंबांना काळजी वाटू लागली. 36 वर्षांत त्याचे पोट असं फुगलं की ते 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेसारखे दिसू लागले. पण खरंच त्याच्याही पोटात बाळ होते, याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. 1999 सालापर्यंत भगतचे पोट इतके फुगलं की त्याला श्वास घ्यायालही त्रास होऊ लागला. अखेर त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी संजूचं फुगलेलं पोट पाहून त्यात ट्युमर असावा असा अंदाज बांधला. त्याचं ऑपरेशन करण्याचं ठरलं. पण सर्जरी करताना डॉक्टरांना त्याच्या पोटाच्या आत जे सापडलं ते पाहून त्यांना धक्काच बसला. त्याच्या पोटात ट्युमर नव्हताच. तर बाळ होतं. एक नव्हे तर दोन बाळ. डॉक्टरांनी ट्युमर समजून ज्याला हात लावला त्याला हाडं होती. आधी एक पाय बाहेर आला, नंतर दुसरा पाय बाहेर आला. नंतर प्रायव्हेट पार्ट, केस, हात, जबडा बाहेर आला. यामुळे डॉक्टरही घाबरले.
डेली स्टार हिस्ट्री डिफाईंडचा हवाला दिलेल्या वृत्तानुसार, या प्रेग्नंट पुरुषाची केस हाताळणारे डॉ. अजय मेहता म्हणाले, सुरुवातीला हाताला हाडं लागली. त्यानंतर एक पाय बाहेर आला आणि मग दुसरा पाय. नंतर प्रायव्हेट पार्ट, केस, हात आणि जबडाही हाताला लागला. आम्ही घाबरलो. आमच्यासाठीसुद्धा हे धक्कादायक होतंय. डॉक्टरांनी या प्रकरणालाला व्हॅनिशिंग ट्विन सिंड्रोम म्हटलं आहे. म्हणजे गरोदरपाणात जुळ्या मुलांचा आईच्या पोटातच मृत्यू झाला. त्यांचा पूर्ण विकास झाला नाही. ते भावाच्या शरीराच्या आत राहिले. म्हणजे ‘फिटस इन फेटू’चं हे प्रकरण. 5 लाखांत असे एक प्रकरण असते.