नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यातील दोन लोकसभा, १८ तालुके, १५ विधानसभा कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक जिल्हा महिला समन्वयक म्हणून ज्येष्ठ नेत्या एड. श्यामला दिक्षित यांची नियुक्ती करण्यात आली. आज उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, समन्वयक श्री. साठे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते दिक्षित यांना नियुक्ती पत्र शिवसेना कार्यालयात देण्यात आले.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशप्रमाणे एड श्यामला हेमंत दीक्षित यांच्या झालेल्या नियुक्तीनंतर नाशिक जिल्हा महिला आघाडी, शिवसेना, विद्यार्थी सेना व विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला.नियुक्ती पत्र स्वीकारल्यानंतर लवकरच विविध जिल्हा,तालुका स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या भेटी घेवून बांधणी पूर्ण करण्यात येईल आणि पदाधिकारी कामकाज, पक्षाला अपेक्षित कार्य, नियोजन, जबाबदाऱ्या, कार्यपद्धती अश्या अनेक विषयांवर जिल्हा,तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे एड श्यामला दीक्षित यांनी सांगितले.याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, सुनील पाटील, गणेश कदम व योगेश म्हस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.