- शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आढावा बैठकीत इशारा
** श्रीकांत रौंदळ
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
तालुक्यातील जलमिशन योजने अंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा योजना, प्रगतीत असलेल्या रस्त्यांची कामे, सिमेंट बंधारे, आरोग्य उपकेंद्र यांची प्रलंबित असलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल इशारा खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी दिला आहे.
येथील पंचायत समितीच्या भिकन जयाजी पाटील सभागृहात आज तहसीलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी खासदार बोलत होत्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, आरोग्य व स्वच्छता, लघु पाटबंधारे, स्वच्छ भारत अभियान, वनविभाग, शालेय शिक्षण इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंजूर असलेली व प्रलंबित असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यात दसवेल, किकवारी, भावडे, गोराणे, आधी गावांसाठी बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधार्यांच्या पाण्यामुळे 300 हेक्टर जमिनीचे क्षेत्र उलताखाली येणार असल्याची माहिती देण्यात आली. निरपुर, अराई, कंधाने पिंपळकोठे, येथील आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली असून तळवाडे भामेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जल जीवन मिशन योजने अंतर्गत भक्षी गावासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम संबंधित ठेकेदाराच्या भेजबाबदारपणामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात सरपंच चेतनवणीस, माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्रीकांत रौंदळ, प्रशांत रौंदळ यांनी खासदारांकडे कैफियत मांडली असता सदरचे काम तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश खा. शोभाताई बच्छाव यांनी कार्यकारी अभियंता महाजन यांना दिले आहेत. तसेच सोमपूर- ताराबाद, अहवा- ताराबाद- लखमापूर, डांग सौंदाणे- सटाणा- मालेगाव, ब्राह्मणगाव- आरई( लांडगे पांदी) या रस्त्यांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या आढावा बैठकीस खा. डॉ. शोभाताई बच्छाव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत बापू अहिरे, प्रल्हाद तात्या पाटील, डॉ. दिनेश बच्छाव, कैलास चावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत पाटील, प्रा. अनिल पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी भैय्या सावंत, पोलीस निरीक्षक योगेश पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश देवरे दिलीप पाटील,, किशोर कदम, रवींद्र पवार, भास्कर सोनवणे, प्रेम राणा वंचित बहुजन आघाडीचे दादा खरे तुकाराम बच्छाव प्रवीण निकम, रवी गोसावी इत्यादी उपस्थित होते.
करणे दाखवा नोटीस
गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा
या आढावा बैठकीस काही जबाबदार वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्यामुळे नाराजी व्यक्त करीत अशा गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी अशी सूचना खा. डॉ. शोभा बच्छाव यांनी केली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्या शिक्षकांवरही क** कारवाई करण्यात यावी असे निर्देश तहसीलदार कैलास जेवढे यांनी दिले आहेत.
यावेळी सटाणा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील, उपनगराध्यक्ष सुमित विजयराज वाघ व नगरसेवक चेतन मोरे यांचा खा. डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Comments are closed.