नाशिक/एनजीएन नेटवर्क
शहरात बकरी ईदनिमित्त गुलशनाबाद नामक शुभेच्छा फलक लावण्यात आले. शहराच्या सारडा सर्कल परिसरात हे फलक लागल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सुतोवाच केले आहे.
नाशकात माध्यमांशी संवाद साधताना भुसे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, यासंदर्भात आपण पोलिसांशी बोलणार आहोत. ही खोडसाळ प्रवृत्ती असून अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही. नाशिक शहरात ईदनिमित्त होर्डिंग लावण्यात आले आहेत. यातील सारडा सर्कल परिसरात एका होर्डिंग्जवर गुलशनाबाद असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर हा शहरभर चर्चेचा विषय बनला होता. आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.