नाशिक/एनजीएन नेटवर्क
लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीज़नस चा दिमाखदार सोहळ्यात पदग्रहण लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजनस ह्या नविन क्लब चे उद्घघाटन, नविन सभासदांना व कार्यकारणीस शपथ देण्याचा व तसेच स्मार्ट सिटीजनस पुरस्कार वितरण असा भव्य कार्यक्रम रविवारी पार पडला.
हॅाटेल इनरीज बाय सयाजी मधील अॅडमीरा बॅन्क्वेट हॅाल येथे हा सोहळा घेण्यात आला. लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजन ह्या नविन क्लबची स्थापना संस्थापक अध्यक्ष लायन जयंत येवला यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने करण्यात आली, कार्यक्रमाची सुरूवात सुप्रसिध्द गायिका व लायन प्रियंका कोठावदे यांनी गणेशवंदनेने केली. लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजनस ह्या नुतन क्लबचे औपचारिक उद्दघाटन प्रांतपाल लायन विजयजी भंडारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तसेच लायन सुनिलजी चेकर डिस्ट्रीक्ट गॅट कॅार्डनिटर यांनी नविन सभासदांना शपथ दिली. माज़ी मल्टीपल कॉन्सिल चेयरपर्सन लायन द्वारकाजी जालान यांनी अध्यक्ष लायन हर्षल चिंचोरे व सर्व कार्यकारणीस शपथ दिली व त्यांना त्याच्या कार्यासंबंधी व जबाबदारी बद्दल माहीती दिली.
संस्थापक अध्यक्ष लायन जयंत येवला यांनी लायन्स क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटीजन च्या स्थापना करण्याचा उद्देश व सामाजिक काम कसे करण्यात येईल यासंदर्भात माहिती दिली. सदर समारंभ प्रसंगी नुतन अध्यक्ष लायन हर्षल चिंचोरे यांनी आदिवासी भागातील जिल्हा परीषद शाळा हिवाळी तालुका त्र्यबंकेश्वर येथील शाळेची गरजु विद्यार्थ्यांना पाच सायकली देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना वाचणाची आवड निर्माण करण्या साठी ग्रंथ पेटी देण्यात आली. सटाणा गावातील अपंग शाळेस एक व्हीलचेयर देण्यात आली. तसेच नाशिक जिल्ह्या मध्ये सामाजिक क्रिडा व विविध क्षेत्रात कार्य करुन ज्यांच्या कार्याने नाशिक ची मान उंचावली अशा व्यक्तिमत्वाच्या कार्याचा बहुमान म्हणुन लायन्स नाशिक स्मार्ट सिटीजन पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. ह्या वर्षी रामकुंड कॅाक्रीटकरणातुन मुक्त करणारे व गोदाघाट संवर्धन करणारे देवांग जानी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांचा उल्लेख स्वच्छता दुत केला असे नाशिकचे चंद्रकांत पाटील, तसेच शुरवीर जवान विजय कातोरे व जिल्हा परीषद हिवाळी चे आदर्श शिक्षक गावित सर यांना देवुन गौरविण्यात आले. तसेच क्लबच्या सभासद प्राध्यापिका लायन प्रतिमा वाघ यांना सावाना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार प्रांतपाल लायन विजय भंडारी यांचे शुभ हस्ते करण्यात आला. नुतन अध्यक्ष लायन हर्षलजी चिंचोरे व नविन कार्यकारणी यांनी अशा जोरदार कार्यांने धडाकेबाज सुरवात केली. समारंभाचे सुत्रसंचलन लायन सौ स्मिता राणे व लायन सौ प्रियंका कोठावदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी लायन दिग्विजय सिंग यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या साठी झोन चेयरपर्सन लायन महेश पितृभक्त लायन श्री विनोद सोनजे सेक्रेटरी लायन श्री दिग्विजय सिंग खजिनदार लायन विलास जी लिधुरे लायन श्री मनोज जी बागुल व सौ जयश्री बागुल लायन योगेश नेरकर लायन सौ रुपाली देशमुख लायन श्री तन्मय जोशी लायन भरत पाटील लायन बिपिन नेरकर लायन सौ स्वाती झोपे यांनी मेहनत घेतली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी प्रांतपाल लायन विक्रांत जाधव व रीजन चेयरपर्सन लायन उषाजी तिवारी पुण्याहुन कॅबिनेट सेक्रेटरी लायन अशोकजी मिस्री कॅबिनेट ट्रेझरर लायन राजेद्रजी गोयल, कॅबिनेट चेयरपर्सन लायन शरदरावजी पवार लायन आनंदजी आंबेकर लायन शामजी खंडेलवाल, मालेगावचे लायन महेशजी पोफळे मनमाड चे लायन विवेकजी बरडीया लायन शशिकांतजी व्यवहारे लायन राजु व्यास, लायन उदय कोठावदे लायन जे. पी. जाधव व तसेच नासिक पुणा मनमाड मालेगाव येथुन असंख्य लायन्स लिडर उपस्थित होते.