मुंबई/एनजीएन नेटवर्क
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमिताभ बच्चन हे स्वत: उत्तर प्रदेशमधल्या आलाहाबाद मतदार संघाचे खासदार होते. तर आई जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार होत्या
अभिषेक बच्चन देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशमधून राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अभिषेक बच्चन इलाहाबाद मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो. दरम्यान, अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्यासंदर्भात सपाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तसंच बच्चन कुटुंबियांनीही यावर अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक बच्चन लोकसभा 2024 साठी निवडणूक लढवू इच्छितो. काही दिवसांपूर्वीच सपा अध्यक्ष अखिलेश यादव मुंबई दौऱ्यावर आले होते.
बच्चन कुटुंब हे समाजवादी विचारधारा मानणारे आहेत, असं समाजवादी पार्टीचे प्रवक्ते फकरुल हसन चांद यांनी म्हटलं आहे. पण अभिषेक बच्चन हे निवडणूक लढवण्याचा निर्णय सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि पक्षातील मोठे नेते घेतील असे फखरुल हसन चांद यांनी म्हटले आहे.