NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘एसएमबीटी’ च्या आरोग्यसाधना शिबिराला प्रारंभ; राज्यभरातून प्रतिसाद

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

मोफत आरोग्यसेवा पुरविणार्‍या एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने बहुप्रतीक्षित आरोग्यसाधना शिबिराला नुकतीच सुरुवात झाली. पहिल्या दिवसांपासूनच या शिबिराला उदंड असा प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाभताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील आजपर्यंतचे हे सर्वांत मोठे आरोग्यशिबीर आहे. तीन महिने चालणार्‍या या आरोग्यसाधना शिबिरात बाह्यरुग्ण तपासणी, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, हृदयउपचार यासोबतच खुबा व गुडघा प्रत्यारोपण, सिझेरियन व नॉर्मल प्रसूती पूर्णत: मोफत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तीन दिवस औषधोपचारांसह बाह्यरुग्ण तपासणीदेखील पूर्णपणे मोफत करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.

सिन्नर-घोटी रस्त्यावर असलेल्या धामणगाव येथील ‘एसएमबीटी हॉस्पिटल’मध्ये विविध आरोग्यउपचार मोफत केले जात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरविणारे हॉस्पिटल म्हणून ‘एसएमबीटी’चा लौकीक आहे. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य साधना आरोग्यशिबिरात अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले होते.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये यंदा कर्करोग, मेंदूसंबंधित आजार, मनकेविकार, दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, मूत्ररोग, अस्थिरोग, कान नाक घसा, जनरल सर्जरी यासोबतच हृदयविकारांवर मोफत शस्रक्रिया केल्या जात आहेत. विशेष म्हणजे सिझेरियन प्रसूती, नॉर्मल प्रसूती यासह व्हेरीकोस व्हेन्स शस्रक्रिया, मोतीबिंदू शस्रक्रिया, तिरळेपणा शस्रक्रिया, संततीची शस्रक्रिया तसेच गरोदर मातांशी सलंगनित सोनोग्राफी व रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.

९१० हजार बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये शेकडो अनुभवी डॉक्टर्स पूर्णवेळ सेवा बजावत आहेत. शिवाय प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ओपीडी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले १७ मॉड्यूलर ऑपरेशन थियेटर्स, 24 तास उपलब्ध असणारा अतिदक्षता अपघात विभाग आणि स्वच्छ व विस्तीर्न हॉस्पिटलचा परिसर यामुळे महाराष्ट्रातील महत्वाचे आरोग्य उपचार केंद्र म्हणून एसएमबीटीचा लौकिक सर्वदूर पोहोचला आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आजारावरील पूर्नवेळ तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. आरोग्यसाधनासाठी एसएमबीटी हॉस्पिटल पूर्णत: सज्ज झालेले असून १ जूनपासून हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मांदियाळी दिसून येत आहे. रुग्णांची वेदना कमी करण्यासोबतच उपचाराबाबतीतले 100 टक्के समाधान देण्यासाठी हॉस्पिटल प्रयत्नशील आहे.

शिबीर कालावधीत हृदयरोग, कॅन्सर, मुत्रपिंडविकार, मधुमेह-उच्च रक्तदाब, स्त्री रोग, लहान मुलांचे आजार, अस्थिरोग, टी.बी.चेस्ट, कान नाक घसा, त्वचारोग, दंतरोग, मेंदूविकार, नेत्ररोग, मानसिक आजार, किडनीसंदर्भातील समस्या तसेच जनरल मेडिसीन वर्गातील कावीळ, हृदय, पोटाचे विकार आदीसमस्यांबाबत मोफत तपासणी करून योग्य ते उपचार व मार्गदर्शनही मोफत मिळणार आहे. शिबीराच्या कालावधीत औषधे, रक्त लघवी तपासणी, एक्सरे-सोनोग्राफी तसेच इतर ज्या शस्रक्रिया शासकीय योजनेत बसत नाहीत अशा सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया अल्पदरात होणार आहेत.

एसएमबीटी हॉस्पिटल संलग्नीत एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्येही शिबीर कालावधीत सर्वच हृदयउपचार शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत होणार आहेत. यामध्ये हृदयविकार ग्रस्त रुग्णांची अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, बायपास, वॉव्ह बदलणे, लहान मुलांची ओपन हार्ट सर्जरी, बलून, पेसमेकर इम्प्लांट, जन्मजात हृदयविकार, ई-पी स्टडी, आदी महत्वाच्या शस्त्रक्रिया या विभागात पूर्णता: मोफत होत आहेत.

यासाठी निष्णात कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओसर्जनची पूर्णवेळ टीम येथे कार्यरत आहेत. हा हृदयरोग विभाग आजमितीला उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अत्याधुनिक विभाग मानला जातो. अत्याधुनिक कॅथलॅब कार्यन्वित असून येथील प्रत्येक सामग्री ही अत्याधुनिक प्रकारची आहे. त्यामुळे हृदयरुग्णांवरचे उपचार दर्जेदार आणि सुरक्षित होतात.

समृद्धी महामार्गामुळे रुग्णसंख्येत वाढ
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्यामुळे तसेच एसएमबीटी हॉस्पिटलला इंटर कनेक्ट असल्यामुळे वैजापूर, बुलढाणा, औरंगाबाद, अमरावती, बीड जालना व अकोला परिसरातील रुग्णांना एसएमबीटी हॉस्पिटलपर्यंत येणे शक्य झाले आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील मोठ्या प्रमाणत रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

मोफत सुपरस्पेशालिटी व स्पेशालिटी शस्रक्रिया
कर्करोग/कॅन्सर शस्रक्रिया
तोंडाचा, जिभेचा कॅन्सर शस्रक्रिया
स्तनाच्या कॅन्सरची शस्रक्रिया
गर्भाशय व अंदाशायाच्या कॅन्सरची शस्रक्रिया
जठराचा व आतड्यांचा कॅन्सर
थायरॉईड ग्रंथीचा कॅन्सर
मुत्राशायातील कॅन्सर शस्रक्रिया

मेंदूची शस्रक्रिया
मेंदूतील गाठींची शस्रक्रिया
मेंदूतील रक्तस्राव शस्रक्रिया
कवटीचे हाड बसवणे

मनकेविकार शस्रक्रिया
मणक्यातील नस मोकळे करण्याची शस्रक्रिया
मणक्यातील गाठींची शस्रक्रिया
मणक्यातील नसांची शस्रक्रिया

दुर्बिणीद्वारे/लॅप्रोस्कोपिक शस्रक्रिया
पोटातील क्लिष्ट शस्रक्रिया
लहान आतडे, मोठे आतडे, स्वादुपिंड, जठर, अन्ननलिकेच्या आजारांची शस्रक्रिया

मूत्ररोग
प्रोस्टेट ग्रंथीची शस्रक्रिया
किडनीस्टोन शस्रक्रिया
मूत्रमार्गातील अडथळ्यांची शस्रक्रिया
खराब झालेल्या किडनीची शस्रक्रिया

अस्थिरोग शस्रक्रिया
गुडघा सांधेरोपण शस्रक्रिया
खुबा सांधेरोपण शस्रक्रिया
दुर्बिणीद्वारे गुडघ्यातील लिगामेंटची शस्रक्रिया
सर्व प्रकाचे फ्रॅक्चर्स

हॉस्पिटलची वैशिष्ट्ये
९१० बेडचा आंतररुग्ण विभाग
१०० आयसीयु बेड
१७ मोड्युलर ऑपरेशन थियेटर्स
अत्याधुनिक कॅथलॅब
२४ तास औषधालय,
रुग्णवाहिका सुविधा
डायलिसिस सुविधा

Leave A Reply

Your email address will not be published.