NGN News
Latest Marathi News

दादांच्या विमान अपघाताचा ‘एएआयबी’ अहवाल समोर; कारणांची उकल..

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. २२ पानांच्या या अहवालात कमी दृश्यमानता, व्हीएफआर (Visual Flight Rules) नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील सुरक्षा त्रुटी याकडे गंभीर बोट ठेवण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. 

मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या नॉन-शेड्युल्ड/VIP फ्लाइटने रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात ‘Go-Around’ करण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “Field in sight” कळवले. मात्र ATC ने 3 किमी दृश्यमानता नोंदवली, जी व्हीएफआर अंतर्गत आवश्यक 5 किमीपेक्षा कमी होती. लँडिंग क्लिअरन्सनंतर काही क्षणांत विमान रनवेच्या डावीकडे सुमारे 50 मीटर अंतरावर झाडांवर आदळले आणि त्यानंतर आग लागून पूर्णतः नष्ट झाले असे या अहवालात म्हटलं आहे. 

Comments are closed.