मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यातील तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध असल्याची माहिती राज्य सरकारने विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटी 11 लाख 44 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 93 लाख 45 हजार 111 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध ठरले आहेत. तर 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरले आहेत.
मंत्री दिपक केसरकर यांनी म्हणाले की, जरी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरले असले तरी त्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवता येणार नाही. या विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळून देण्यासाठी यंत्रण देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.