घोटी /राहुल सुराणा
अतिशय दुर्गम व आधिवासी भागात असलेल्या मुळचा नंदुरबार जिल्हाचा पण घोटीत वास्तव्यास असणाऱ्या मनिषा व शेखर निकुंभ या दापत्याचा चिमुकला कौस्तुभ याने इस्त्रो संस्था व चंद्रयान बाबत सविस्तर माहिती आत्मसात करत त्याबाबत व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओद्वारे आपल्या चिमुकल्या मित्रांना माहिती देत चंद्रयानने सर्वच आडथळे पार करत भारताचा झेंडा चंद्रावर फडकवल्याने त्याचा हा व्हीडीओ व्हायरल झाल्याने त्याच सर्वत्र कौतूक होत आहे.