NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

संतापजनक  ! पाचवीतील मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह..

0

बीड : एका अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह लावण्याचा संतापजनक प्रकार समोर बीडमध्ये समोर आला आहे. सदर घटनेत पहिल्या नवरदेवाने पळ काढला, तर दुसरा नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

प्शराप्हत माहितीनुसार, शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला देखील, मात्र या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. त्यामुळे त्याने तिथून पळ काढला. या नंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासनाला मिळताच, पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. 

Leave A Reply

Your email address will not be published.