पणजी/एनजीएन नेटवर्क
निपुत्रीक दाम्पत्यांच्या जीवनात आशेचा नवकिरण निर्माण करणारी आयव्हीएफ ट्रीटमेंट गोव्यात मोफत होणार आहे.गोवा मेडिकल कॉलेज हे देशातले पहिले रुग्णालय असणार आहे, जिथे आयव्हीएफ उपचार होतील. रुग्णांकडून पैसे घेतले जाणार नाही. सीएसआरच्या माध्यमातून पैसे येतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट रिप्रोडक्टीव्ह टेक्नॉलॉजी आणि आययूआय फॅसिटीली सुरू केली.
यासंदर्भात, आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले, रुग्णालयाला कार्पोरेट सोशल रिस्पान्सिबीलीटी (सीएसआर) फंडमध्ये कोट्यवधी रुपये मिळाले. या पैशाचा उपयोग उपकरण खरेदीसाठी केला जात आहे. आम्ही सर्वोत्तम सुविधा प्रदान करणार आहोत. ही सुविधा गोवा सरकारने दिल्यामुळे निपुत्रीक दाम्पत्यांना मोठा फायदा होणार आहे. मुलबाळ होण्याचं सुख त्यांना तांत्रिक पद्धतीने मिळणार आहे. १०० जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यानंतर पुन्हा अॅडव्हान्स बुकिंग सुरू करावी लागणार आहे.