NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सौंदर्याच्या जाळ्यात ओढून बड्या हस्तींना चुना लावणारी टोळी जेरबंद !

0

पणजी/एनजीएन नेटवर्क

मोठ्या कंपन्यातील व्यक्तींना सौंदर्याच्या जाळ्यात ओढून संबंध तयार करून त्य्नाच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे. हे पाचजण मिळून मोठ्या कंपन्यातील लोकांना फसवायचा धंदा करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांवर आतापर्यंत मोठ्या उद्योजकांना फसवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेष म्हणजे सौंदर्याच्या जाळ्यात ओढून संबंध तयार करायच्या, त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करीत होत्या. तक्रार मागे घेण्यासाठी त्या लोकांकडून लाखो रुपये घेतले असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. गुजरातच्या लोकांना त्या महिलांनी अधिक फसवल्याची माहिती पुढे आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, या महिलांनी गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील अनेक पुरुषांना लुटले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेकांच्या नावाने तक्रारी सुध्दा दाखल केल्या आहेत. ज्यावेळी त्या महिलांची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी सोबत असलेल्या अनेकांची नावे सुध्दा सांगितली आहेत. हा सगळा कारभार या पाच जणांनी बिझनेस मिटिंगच्या नावाखाली सुरु केला होता. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात त्यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत. ते स्वत:चे तिथे एक हॉटेलची रुम बुक करीत होते. त्यानंतर त्यांना सांगायचे की दुसरी रुम खाली नाही. एकाच रुममध्ये थांबल्यानंतर ती महिला त्या व्यापाऱ्याशी शारिरीक संबंध ठेवायची. ज्यावेळी तो व्यापारी तिथून निघून जायचा त्यावेळी महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायची.

पीडित महिला एफआयआर नोंदवण्यासाठी पुराव्यासह पोलिस ठाण्यात येत होत्या. त्या पुरुषांची काही कपडे सुध्दा पुरावा म्हणून घेऊन यायच्या. पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला या गोष्टीवर त्या विश्वास ठेवायला त्याग पाडत होत्या. त्यामुळे अनेक तक्रारी दाखल होत होत्या. त्यानंतर त्या आरोपीकडून मोठी रक्कम उकळत होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.