- जय शंकर प्रतिष्ठान, पुणे या विश्वस्त संस्थेतर्फे गौरव
** एनजीएन न्यूज नेटवर्क
पुणे: अध्यात्मिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात अथक, निःस्पृह व निःस्वार्थ सेवा करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जय शंकर प्रतिष्ठान, पुणे या विश्वस्त संस्थेतर्फे नाशिक येथील ॲड. भानुदास शौचे यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, तर मुंबई-अंधेरी येथील मोना विकास साने यांना कै. सौ. माई सुरेखा पुराणिक स्मरणार्थ ‘माई अभ्यंकर कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ प.पू.सद्गुरू शंकर महाराजांच्या प्रकटदिनाप्रसंगी प्रदान करण्यात आला.
जय शंकर प्रतिष्ठानचे संस्थापक प.पू. पप्पाजी पुराणिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात महान संत प.पू. महंत देवराह जंगलबाबा, प्रयागराज आणि मा. प.पू. सौ. रीना उपाध्याय, प.पू. महंत प्रेममूर्ती कृष्णकांतजी दास, हनुमान गढी, अयोध्या, प.पू. आनंदस्वामिजी महाराज, मठाधिपती तपोवन, सौ अनुराधाताई देशमुख , तसेच सचिनजी वाडे-पाटील, अखिल भारतीय पेशवा संघटना यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम ₹ ५,०००/- असे पुरस्काराचे स्वरूप होते. शरद सोनटक्के, अमित शेष यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी सद्गुरू शंकर महाराज भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.