NGN News
Latest Marathi News

भाजप सुशासन प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजकपदी प्रदीप पेशकार

  • अतुल खराटे यांच्याकडे प्रदेश सहसंयोजकपदाची जबाबदारी; विविध विभागांसाठी सहसंयोजक आणि विषयतज्ज्ञांच्या नियुक्त्या जाहीर

** एनजीएन न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला आणि सुशासनाच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने पक्षाच्या गुड गव्हर्नन्स (सुशासन) प्रकोष्ठाच्या प्रदेशस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रदेश संयोजकपदी प्रदीप पेशकार यांची, तर प्रदेश सहसंयोजकपदी अतुल खराटे यांची नियुक्ती केली आहे.

या नियुक्त्यांसोबतच राज्यातील विविध विभागांमध्ये संघटनात्मक समन्वय साधण्यासाठी विभागीय सहसंयोजकांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी आदित्य पित्ती, विदर्भ विभागासाठी नितीन आळसी, मराठवाडा विभागासाठी सुधीर धुत्तेकर, ठाणे-कोकण विभागासाठी राजेंद्र सरोज आणि उत्तर महाराष्ट्र विभागासाठी मनोज जोशी यांची विभागीय सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुशासन प्रकोष्ठाच्या कामकाजाला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी विषयानुसार विशेष जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या आहेत. यामध्ये आयटी (I.T.) विभाग तज्ज्ञ म्हणून हेमंत चाफळे, व्यापार-उद्योग (Trade & Industry) विभागासाठी चंद्रकांत ठक्कर, व्यवस्थापन (Management) तज्ज्ञ म्हणून नरेंद्र गंगाखेडकर, वित्त (Finance) विभागासाठी विनीत देव, शिक्षण (Education) विभागासाठी श्रीनिवास गायकवाड आणि ई-गव्हर्नन्स (E-Governance) विभाग तज्ज्ञ म्हणून विजय वरुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे भाजपच्या सुशासन प्रकोष्ठाच्या राज्यस्तरीय कामकाजाला नवी दिशा मिळण्यासोबतच प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि लोकाभिमुख शासनव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे योगदान मिळणार आहे.

Comments are closed.