NGN News
Latest Marathi News

टाटा डॉट कार्स कडून एरिस लाँच

भारतातील ग्राहकांना कॉम्पॅक्ट सेदान निवडण्यासाठी नवीन पर्याय दिला

·         वैयक्तिक ग्राहकांसाठी उद्देशपूर्ण विशेष निर्मिती: एरिस विशेषतः खाजगी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. या कारमध्ये दैनंदिन ड्रायव्हिंग आणि लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान व्यावहारिकतेसह डिझाइन, आरामदायीपणा, तंत्रज्ञान, सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि वैयक्तिक शैलीवर विशेष भर देण्यात आला आहे.

·         पेट्रोल आणि आयसीएनजी पॉवरट्रेन पर्याय: ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देत एएमटी पर्यायासह ही कार अधिक परिपूर्ण आणि उत्साहवर्धक अनुभव देते.

·         भारतातील सर्व टाटा डॉट कार्स  डीलरशिप्सवर उपलब्ध: पेट्रोल व्हेरिएंटसाठी ५.२९ लाख रुपये आणि आयसीएनजी व्हेरिएंटसाठी ६.२९ लाख रुपये या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध. बुकिंग्स आता सुरू झाले आहे आणि डिलिव्हरी लवकरच सुरू होतील.

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

टाटा डॉट कार्स  ने आज ऑल-न्यू टाटा एरिसच्या लाँचची घोषणा केली, जी विशेषतः वैयक्तिक कार खरेदीदारांसाठी डिझाइन केलेली कॉम्पॅक्ट सेदान आहे. वैशिष्ट्यपूर्ण नवीन ओळख आणि वैयक्तिक महत्त्‍वाकांक्षांवर भर देणारी एरिस आरामदायीपणा, स्थिरता, एैसपैस जागा, कार्यक्षमता आणि आकर्षकता या सेदानच्या मूळ वैशिष्ट्यांना आधुनिक डिझाइन, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि आजच्या ग्राहकांना अपेक्षित असलेल्या मालकीच्या उत्कृष्ट अनुभवाशी एकत्रित करते, ज्यासह कॉम्पॅक्ट सेदानला नव्या उंचीवर घेऊन जाते. पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑल-न्यू एरिसची सुरुवातीची किंमत पेट्रोल व्हेरिएंटसाठी ५.२९ लाख रुपयांपासून आणि आयसीएनजी व्हेरिएंटसाठी ६.२९ लाख रुपयांपासून सुरू होते.

एरिससह, टाटा डॉट कार्स  पारंपारिकपणे केवळ व्यावहारिकता, कार्यक्षमता आणि मूल्यावर आधारलेल्या श्रेणीमध्ये नवीन दृष्टिकोन घेऊन येत आहे, ज्यामुळे अधिक नाविन्यता, वैयक्तिकता आणि समकालीन अनुभवासह या क्षमतांना अधिक दृढ करण्यात आले आहे. असे करत एरिसने एकाच उत्पादनाच्या माध्यमातून फ्लीट आणि वैयक्तिक  ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्योगामधील परंपरेला मोडून काढले आहे आणि केवळ वैयक्तिक खरेदीदारांच्या गरजा व महत्त्वाकांक्षांना प्राधान्य देऊन विशेष पर्याय सादर केला आहे.

एरिस लाँच करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. शैलेश चंद्रा म्हणाले:“सेदान कारची कालातीत अभिव्यक्ती राहिली आहे, जेथे सेदानचे निष्ठावान ग्राहक आहेत, जे आरामदायीपणा, एैसपैस जागा, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि व्यावहारिकता यांच्या अनोख्या संगमाला प्राधान्य देतात. एरिसच्या माध्यमातून, आम्ही विविध बॉडी स्टाईल्स आणि पॉवरट्रेन पर्यायांमध्ये अर्थपूर्ण पर्याय उपलब्ध करून देण्याचे टाटा डॉट कार्स  चे तत्त्व प्रत्यक्षात आणत आहोत, ज्यामध्ये ग्राहकांसाठी स्टायलिश नवीन सेदान सादर केली आहे, जे आपल्या कारला आपली प्रगती, यश आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक मानतात. डिझाइन आणि इंजिनिअरिंगपासून तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग अनुभवापर्यंत प्रत्येक निर्णयात ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून एरिसची निर्मिती वैयक्तिक मालकीसाठी करण्यात आली आहे. हा एकमेव दृष्टिकोन या कारला विशिष्ट उद्देश आणि अद्वितीय ओळख देतो, तसेच ग्राहकांना एरिसची निवड करण्याचे प्रत्येक प्रबळ कारण देतो.”

Comments are closed.