
- राजमाता जिजाऊ महिला मंच आणि वैनतेय इंग्लिश मेडीयम स्कूलचा संयुक्त उपक्रम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
निफाड : राजमाता जिजाऊ महिला मंच. निफाड आणि वैनतेय इंग्लिश मेडीयम स्कूल. निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने
रक्षाबंधन सणाच्या औचित्याने सीमेवरील सैनिक. डॉक्टर. पोलीस. सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे गुलाब वृक्ष व मोमेन्टो देऊन स्वागत. सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी व मंचच्या महिलांनी सैनिकांना राखी बांधून त्यांच्या त्यागाला. शौर्याला. राष्ट्रासेवेला अभिवादन केले विद्यार्थांनी देशभक्तीपर गीत व नृत्याने राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली.
नायब सुभेदार अरुण गव्हाणे. हवालदार संजीव पाटील. दीपक खेलूकर. प्रेमा भोर. सुभेदार प्रमोद पठारे कारगिल योद्धा तुषार खरात. पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती बैरागी डॉ. सुप्रिया पाणगव्हाणे सफाई कर्मचारी श्रीमती लता शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
सैनिकांनी विध्यार्थ्यांशी झालेला संवाद. त्यांनी आपले अनुभव मांडत देशप्रेम. त्याग. शिस्त. कर्तव्यनिष्ठा. जबाबदारी यांचे महत्व पटवून दिले. विद्यार्थांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. राखीचा नाजूक धागा केवळ नात्याचा नही तर कृतज्ञता. सन्मान आणि राष्ट्रासेवेचा बंध असुन यादिवशी आम्ही भगिनी आपल्या सैनिकांशी जोडू पहाट आहोत हा संदेश देण्यात आला.
यावेळी श्री. वि. दा. व्यवहारे सर. अनिल कुंदे. डॉ. उत्तमराव डेर्ले. राजेंद्र राठी. Ad. वाघावकर. मधुकर राऊत. वैकुंठ पाटील. सागर निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. राजमाता जिजाऊ महिला मंच अध्यक्षा डॉ. सीमा डेर्ले. सौं.सिधुताई धारराव. भारती कापसे. मालती वाघावकर. अरुणा कराड. सुनीता कुंदे. दीपाली तासकार. वैशाली खाटेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सौं. पल्लवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी व उपस्थितानी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Comments are closed.