NGN News
Latest Marathi News

नाशिककर सोहमची जिओ हॉटस्टार वर समालोचक म्हणून दस्तक

  • ‘आयपीएल’ मध्ये किरण मोरे व धवल कुलकर्णी  यांच्या सोबत कॉमेन्ट्री – करण्याची संधी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : युवक मराठी क्रिकेट समालोचक सोहम शहाणेने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या एन पी एल पासून आय पी एल पर्यंत घेतली आहे. सोहम फक्त ११ वर्षांचा असताना १५ वर्षांपूर्वी त्याला एन पी एल स्पर्धेचे व्यासपीठ मिळाले होते. सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर स्पर्धेत सोहमला माजी क्रिकेट कसोटीपटू किरण मोरे व धवल कुलकर्णी  यांच्या सोबत जिओ हॉटस्टार वर मराठीत सामन्याचे थेट धावते वर्णन – कॉमेन्ट्री – करण्याची संधी मिळाली आहे. 

आर जे सोहम अशी ओळख प्रस्थापित करणारा हा सोहम शहाणे. नाशिकमधील एनपीएल ते आयपीएल असा त्याचा अतिशय रोमांचक प्रवास आहे. सोहमने काही काळ आरजेचे काम केले. यू ट्यूब आणि इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर त्याचे स्वतःचे चॅनल आहे. हा प्रवास सुमारे आठ वर्षांचा आहे. त्याचे मिळून सुमारे नऊ लाख फॉलोअर्स आहेत. युवा पिढीत तो खूप लोकप्रिय कन्टेन्ट क्रिएटर आहे.

सुरुवातीला वर उल्लेख केल्याप्रमाणे क्रिकेट कॉमेंट्रीचा त्याचा प्रवास एनपीएल क्रिकेट पासून सुरू झाला. त्याने पहिल्यांदा कॉमेन्ट्री केली तेव्हा तो फक्त अकरा वर्षांचा होता. त्यानंतर सलग काही वर्षे त्याने एनपीएल मध्ये कॉमेन्ट्री केली. इतर मुले क्रिकेट खेळायची तेव्हा सोहम टीव्ही समोर बसून कॉमेन्ट्री करायचा प्रयत्न करायचा. अवघा अकरा बारा वर्षांचा असताना त्याला पहिल्यांदा कॉमेंट्रीची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केले आहे.या सगळ्या काळात त्याला वेळोवेळी माननीय हर्षा भोगले, संदीप पाटील अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.त्यावेळी आणि त्यानंतरही या प्रवासात त्याच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला, त्याला संधी दिली आणि मनापासून प्रोत्साहन देत सहकार्य केले त्यांच्याप्रती तो नेहमीच कृतज्ञ आहे आणि राहील अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. आत्ता पर्यंत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या स्थानिक सुमारे पाचशे सामन्यांमध्ये समालोचन केले आहे. रेडिओ आणि समाजमामध्ये नव्हती तेव्हाही त्याच्या आयुष्यात क्रिकेट कॉमेन्ट्री होती असे तो म्हणतो. कारण कॉमेन्ट्री करण्याची त्याला भयंकर आवड आहे. हेच वेड त्याला एनपीएल पासून आयपीएल पर्यंत घेऊन गेले आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी त्याचे खास अभिनंदन करून भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.