भुवनेश्वर/एनजीएन नेटवर्क
ओडिशातील एका कुटुंबात जन्मलेल्या मंथा सुब्बलक्ष्मी यांनी आतापर्यंत ८० लाख वेळा रामाचे नाव लिहिले आहे. आणि त्यांना विश्वास आहे की लवकरच त्या एक कोटीपेक्षा जास्त वेळा रामाचे नाव लिहून पूर्ण करतील. आध्यात्मिक आणि धार्मिक कुटुंबात वाढलेल्या, मंथा सुब्बलक्ष्मी यांना आंध्र प्रदेशातील एका आध्यात्मिक शिबिरात रामाचे नाव लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे पती दिवंगत सर्वेश्वर शास्त्री हे देखील रामाचे नामस्मरण करायचे. लहानपणी त्यांनी जो संकल्प केला, तो आजही अखंडपणे सुरू आहे.
आश्चर्य म्हणजे लोक फक्त त्यांची ही भक्ती पाहण्यासाठी जमतात, आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. मंथा सुब्बलक्ष्मी गेल्या काही महिन्यांपासून उत्तराखंडमधील चंबा येथे राहत आहेत. येथे त्या लोकांना रामाचे नाव लिहिण्याचे महत्त्व समजावून सांगतात. ९४ वर्षीय मंथा सुब्बलक्ष्मी यांची भक्ती अप्रतिम आणि अद्वितीय आहे. रामनामाच्या भक्तीमध्ये त्यांनी असे काही केले आहे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.