NGN News
Latest Marathi News

सातपूरला ट्रकखाली चिरडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

आजीसोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना काळाचा घाला

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आपल्या आजीसोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने आठ वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. नेविका अभिषेक नेरकर ( रा. मयूर स्वीटच्या पाठीमागे, आनंदवल्ली, पाईपलाईन रोड सातपूर) असे मयत मुलीचे नाव आहे. सातपूर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, नेविका आणि तिची आजी आपल्या ज्युपिटर दुचाकीवरून घराकडे जात होत्या. त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने कट मारला. त्यामुळे तोल जाऊन नेविका खाली पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नेविकाची आजीदेखील जखमी झाली. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत संतप्त भावना व्यक्त केल्या. या परिसरात सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

Comments are closed.