- अध्यक्ष आशिष नहार यांच्या हस्ते झेंडावंदन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) कार्यालयाच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निमा अध्यक्ष आशिष नहार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष आशिष नहार तसेच उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना विशद केले. देशाच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीत उद्योगजगताची भूमिका महत्त्वाची असून नाशिकच्या औद्योगिक विकासासह रोजगारनिर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास निमा अध्यक्ष आशिष नहार, माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, संजीव नारंग, मंगेश पाटणकर, निमा सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष मनीष रावल, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, आयमा अध्यक्ष ललित बूब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, प्रमोद वाघ, निखिल तापडिया, विवेक पाटील, हर्षद बेळे, अविनाश बोडके, संजय महाजन, सुधीर बडगुजर, सचिन कंकरेज, संदीप भदाणे, मिलिंद राजपूत, गोविंद बोरसे, जयश्री कुलकर्णी, हेमंत खोंड, एस. के. नायर, नितीन आव्हाड, कैलास पाटील, कैलास आहेर, गौरव धारकर, रावसाहेब रकिबे, उदय रकिबे, अजय पाटील आदींसह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
Comments are closed.