NGN News
Latest Marathi News

राजस्थानात मृत्यूचे तांडव ! शाळेतील वर्गाचे छत कोसळले; ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

जयपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क

एका सरकारी शाळेच्या इमारतीचे छत कोसळल्याने ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमधील झालावाड येथे घडली. मनोहरथाना ब्लॉकमधील पिपलोडी सरकारी शाळेतील एका वर्गात मुले बसली होती तेव्हा खोलीचे छत कोसळले आणि त्याखाली ३५ मुले गराड्यात चिरडली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी तत्काळ ढिगारा काढून मुलांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मनोहरथाना रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, 5 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, इथे सकाळपासूनच पाऊस पडत होता. प्रार्थनेची वेळ झाली तेव्हा शाळेच्या मैदानात सर्व वर्गातील मुलांना एकत्र करण्याऐवजी त्यांना खोलीत बसवण्यात आले जेणेकरून ते भिजू नयेत. त्यानंतर काही वेळातच छत कोसळले. अपघातावेळी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये ७१ मुले होती. २ शिक्षकही शाळेत उपस्थित होते, परंतु छत कोसळण्याच्या वेळी ते इमारतीबाहेर होते, ते सुरक्षित आहेत.

Comments are closed.