NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

इगतपुरीत २४ तासांत ६० मिमी पाऊस; भावली ‘ओव्हरफ्लो’ कडे..

0

घोटी/राहुल सुराणा

जुलै महिना संपण्यास एक आठवडा शिल्लक असताना पावसाच्या माहेरघरात अजून पावसाची अजून बरीच बॅटिंग शिल्लक असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत तालुक्यातील धरणाच्या साठ्यात अजून बराच पल्ला गाठावयाचा आहे.      

       नाशिक जिल्ह्याच्या चेरापुंजीला पावसाचा संथ गतीने वाटचाल असल्याने धरणात पाण्याची संथ गतीने वाढ होत आहे.  इगतपुरी तालुक्यात जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून सुरवात झालेल्या पावसाने जोरात नसून रिमझिम पावसाच्या वाटचालीची शेतीला पूरक असा पाऊस सध्या होत आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस नसताना तालुक्यात पश्चिम भागात मात्र सातत्याने पाऊस असल्याने शेतीची कामे जोरदार सुरु असून बळीराजा शेतीकामात व्यस्त आहे. परंतु जोरदार पाऊस नसल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने धरण साठ्यात जुलै संपण्यास आठवडा शिल्लक असताना धरणात जलसाठा कमी आहे. तुलनेने लहान असणाऱ्या भावली धरणाची मात्र ओव्हरफ्लो कडे वाटचाल असून जर असा पाऊस राहिला तर  येत्या दोन ते तीन दिवसात १०० %  धरण भरेल.  इगतपुरी घोटीसह ग्रामीण भागातही पावसाने जोर धरला आहे . परंतु एकूण आकडेवारी बघता अजून बराच लांब पल्ला गाठायचा आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्यातील धरणसाठ्यात आद्यपही पाहिजे तसा जलसाठा संचित झाला नाही मात्र गेल्या महिनाभरात  झालेल्या पावसामुळे दारणा, मुकणे व भाम  धरणांत ५० % च्या पुढे जलसाठा संचित होऊ लागला आहे. इगतपुरी तालुक्यात चोवीस तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली.
        दारणा धरणात ७८ % पाणीसाठा संचित झाला असून ११०० क्यूसेस ने पाण्याच्या विसर्ग नांदूरमध्येमेश्वर धरणाच्या दिशेने होत आहे.   या रिपरिप पावसामुळे शेतीच्या कामांना  चांगली सुरुवात झाली असून काही ठिकाणी भात लागवडीची कामेही सुरु आहे. या पावसाचे प्रमाण संततधार नसल्याने घोटी शहरात भर पावसाळ्यात सुद्धा चांगल्या प्रमाणात गर्दी असून काल झालेल्या शनिवारच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. 

 दरम्यान धरणांचा व पावसाचा तालुका असलेल्या या इगतपुरी तालुक्यात धरणांच्या जलसाठयात अद्यापही थोडीफार प्रगती झालेली असून रविवारी  सकाळी ६ वाजेपर्यंत वाकी धरणात अवघे २०. ५१  टक्के जलसाठा होता तर दारणा धरणात  ७७. ९४ टक्के स जलसाठा होता तर भावलीत ९०. ३१   टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून रविवारपर्यंत झालेल्या  पाऊसाने फक्त दारणा, भाम, मुकणे  व भावली या धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे . मात्र वाकी धरणात अद्यापही २० टक्के साठा आहे तर कडवा,मुकणे धरणांच्या जलसाठयात वाढ होत आहे. तालुक्यामध्ये रविवारी  सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १५१२  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रविवार  (दि. २३) सकाळी ६ वाजेपर्यंत झालेला पाऊस, धरणातील साठा, साठ्याची टक्केवारी 
■ दारणा —   ५५७२ दलघफू  ७७. ९४ टक्के तर पाऊस २०  मिमी ■ भावली —  १२९५ दलघफू  ९०. ३१ टक्के पाऊस ६७  मिमी ■ मुकणे —  ३९६० दलघफू  ५४. ७० टक्के, पाऊस १७  मिमी ■ वाकी —   ५११ दलघफू  २०. ५१ टक्के पाऊस २०  मिमी ■ कडवा —  ६१४ दलघफू ३६. ३७ टक्के  पाऊस १३ मिमी

■ भाम —      १२६४ दलघफू  ५१. ०३ टक्के पाऊस ३५  मिमी 

Leave A Reply

Your email address will not be published.