मुंबई/हैदराबाद : बालदिनाच्या निमित्ताने भारतीय पालक त्यांच्या मुलाला दूध का देतात, हे समजून घेण्यासाठी गोदरेज जर्सीने एक सर्वेक्षण केले. काहींनी तंदुरुस्त राहण्यासाठी, वजनात सातत्य ठेवण्याची गरज ठळकपणे सांगितली यासोबतच ऊर्जा मिळवण्यासोबतच आणि जेवणाऐवजी दूध प्यायले जाते. देशभरातील 60% पालकांनी मुलांमधील कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी मुलांना दूध देत असल्याचे सांगितले.
दिल्ली, लखनौ, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता येथील ग्राहकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. ‘बॉटम्स अप…इंडिया सेज चीअर्स टू मिल्क!’ या शीर्षकांतर्गत हा सर्वसमावेशक अभ्यास करण्यात आला. यात ग्राहकांच्या पसंतीबरोबरच उद्योगातील कल लक्षात येण्यास मदत होते. आपल्या पाल्याला दूध देण्यामागील पालकांची कारणे समजून घेण्यापलीकडे, या सर्वेक्षणाद्वारे मुलांसाठी ते दुधाशी संबंधित कोणती उत्पादने स्वीकारतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
या निष्कर्षांबाबत गोदरेज जर्सीचे सीईओ भूपेंद्र सुरी म्हणाले, “दुधाचे पौष्टिक मूल्य हे मुलांसाठी अत्यंत चांगले असल्याचे जागतिक स्तरावरील तसेच भारतातही अनेक संशोधनांनी सिद्ध केले आहे. वाढत्या मुलांसाठी उच्च पौष्टिक गुणवत्तेची प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए अत्यंत आवश्यक असते. अशा काळातच पालक आपल्या मुलांना दूध देण्यास प्राधान्य का देतात हे आमच्या ग्राहक सर्वेक्षणातून पाहणे उत्साहवर्धक आहे.”
अहवालातून समोर आलेली आणखी एक मनोरंजक माहिती अशी की, 90% भारतीय मुले आठवड्यातून 4-5 वेळा दूध पितात आणि 40% पेक्षा जास्त पालक फ्लेवर्ड दूध हे शाळेचा डबा म्हणून किंवा दिवसभरात पिण्यासाठी किंवा विशेषतः खेळाच्या वेळी ते प्यायला देण्याला प्राधान्य देतात.
हे सर्वेक्षण YouGov द्वारे डिझाइन आणि आयोजित केले गेले होते. गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड (जीएव्हीएल) ची उपकंपनी क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड हा गोदरेज समूहाचा वैविध्यपूर्ण खाद्य आणि कृषी-व्यवसाय समूह, गोदरेज जर्सी या ब्रँड नावाने उत्पादनांची विक्री करतो.