NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सीबीआय धाड ! अतिरिक्त आयुक्ताच्या घरात सापडली 6 कोटींची रोकड

0

पुणे/एनजीएन नेटवर्क

विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त अनिल रमोड सीबीआयच्या सापळ्यात अडकले आहेत. जमीन परतावा देण्यासाठी लाच स्वीकारताना सीबीआयने अनिल रमोड यांना अटक केली आहे. महसूल विभागात काम करणाऱ्या उपायुक्त अनिल रामोड 8 लाख रुपयांची लाच स्वीकारत होते, तेव्हाच सीबीआयने सापळा रचून धाड टाकली. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले.

 नॅशनल हायवेच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये लवादाची भूमिका पार पाडणाऱ्या अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर सीबीआयने ही रेड टाकली. अनिल रामोड सातारा, सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यातील भूसंपादनाच्या अपिलवर निकाल द्यायचे, यात ते भुसंपादनाचा मोबदला वाढून देताना 1 कोटीला 10 लाख मागायचे, असा आरोप ऍडव्होकेट याकूब साहेबू तडवी यांनी केला आहे. तडवी यांनची याबाबत सीबीआयकडे तक्रार दिली होती.

तडवी यांच्या तक्रारीनंतर सीबीआयने ट्रॅप लावून रामोड यांना 8 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आता त्यांच्या पुणे आणि नांदेडमधील घरीही बेहिशेबी मालमत्तेची मोजदाद सुरू आहे. सीबीआयने रामोडच्या पुण्यातील दोन घरी छापेमारी केली. या छाप्यात अंदाजे तब्बल 6 कोटींची रोकड सापडली तसेच 14 बेहिशेबी मालमत्तांचे पेपर्स सापडलेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.