मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. पहिला टप्प्यात ३० हजार आणि दुसऱ्या भरतीत २० हजार भरती केली जाणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
निवृत्त शिक्षकांकडून काम करून घेतले जाणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा शिक्षक भरती होणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते. याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असेही यावेळी केसरकर म्हणाले. ७० वर्षाच्या इतिहासात आम्ही एवढे मोठे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षण दर्जा वाढवला असल्याचेही ते म्हणाले. टीईटी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाबाबत आयुक्तांशी विचार विनिमय करून त्याच्या शिक्षक भरती बाबत निर्णय घेणार असल्याचे केसरकर म्हणाले. शाळात विद्यार्थी किती असतात यावर नियंत्रण नसत. सर्व शाळेवर आता कॅमेरे लावले जातील. महाराष्ट्र हिताचे निर्णय घेतले जातील. सेवा निवृत्त घाट घातला नाही तर भरतीला स्टे लागला म्हणून कंत्राटी घेतल्याचे केसरकर म्हणाले.