मुंबई/एनजीएन नेटवर्क
नागपूर-मुंबई या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग उद्घाटनापासून त्यावर होत असणाऱ्या अपघातामुळे सातत्याने चर्चेत आहे. या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याने महामार्गाच्या बांधकामात काही त्रुटी आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, सरकारकडून अपघात कमी करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजनाही आखल्या जात आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात समृद्धी महामार्गावर झालेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी राज्य सरकारने सांगितली आहे.
समृद्धी महामार्गावर गेल्या पाच महिन्यात 358 अपघात, 95 लोकांचा मृत्यू झाल्याची राज्य सरकारची विधान परिषदेत सांगितले. वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालवताना सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेनची शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहन नसने, वाहन अवैध्यरित्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे, चालक सतर्क न करणे ही समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची कारणे असल्याचे सरकारने म्हटले आहे.