श्रीनगर/एनजीएन नेटवर्क
जन्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी 5 परदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. एलओसीजवळ जवानांकडून सर्च ऑपरेशन जारी करण्यात आले आहे. कुपवाडा इथे सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच विदेशी दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलांनी परिसरात घेराव घातला असून शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुरक्षा दलांना येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. खोऱ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर, जवान अलर्ट झाले. दहशतवाद्यांचा एकही मनसुबा यशस्वी होऊ न देण्यासाठी मोठी कारवाई केली जात आहे. सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ऑपरेशन डोगा नार अंतर्गत मंगळवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचे सांगण्यात आले आहे.