नाशिक/एनजीएन नेटवर्क
ऐन महसूल सप्ताहात 15 लाखांची लाच स्वीकारताना नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना राहत्या घरी ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले होते. तक्रारदाराची गौण खनिज प्रकरणातील जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी त्यांनी या रकमेचा स्वीकार केला. या प्रकारामुळे जिल्हाभर खळबळ उडाली होती.
बहिरम हे वास्तव्यास असलेल्या कर्मयोगी नगर परिसरातील मेरिडियम गोल्ड अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शनिवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. त्यानंतर काल संध्याकाळ पासून सुरु असलेली त्यांच्या घराची झाडाझडती पहाटेपर्यंत सुरु होती. ज्यात एसीबीला 4 लाख 80 हजार रोख रक्कम, 40 तोळे सोने आणि 15 तोळे चांदीचे दागिने आणि इतर कागदपत्रे असा जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल प्राथमिक तपासात आढळून आला आहे.