वणी/एनजीएन नेटवर्क
वणी-सापुतारा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी खोरी फाट्या जवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वणी-सापुतारा महामार्गावर खोरी फाटा जवळ क्रुझर व मारुती सियाज कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले. सदर अपघातातील मृतांमध्ये विनायक गोविंद क्षीरसागर ( ३७), योगेश दिलीप वाघ (१८), जतीन अनिल फावडे (२३) आणि रविंद्र मोतीचंद चव्हाण (२२) यांचा समावेश आहे. अपघातात कमळी युवराज गांगोडे, कल्पना सुभाष सोळसे, तुळशीराम गोविंदा भोये, ललीता युवराज कडाळे, रोहिदास पांडुरंग कडाळे, योगेश मधुकर सोळसे, सुभाष काशिनाथ सोळसे, देवेंद्र सुभाष सोळसे, नेहल सुभाष सोळसे हे जखमी झाले. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येवून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.