सटाणा/विशेष प्रतिनिधी
शालेय स्तरावर शिक्षण घेत असताना विविध स्पर्धांमध्ये जर मुलांचा सहभाग असला तर मुलांचे व्यक्तिमत्व खुलून दिसते. एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये सर्व विविध स्तरातून राज्यभरातून आलेल्या आदिवासी समाजातील मुलांचा बौद्धिक विकास होणे गरजेचे आहे. मुलांमध्ये उपजत गुण असतात परंतु त्या गुणांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्पर्धात्मक शिक्षणाची गरज असते. तेच शिक्षण देण्यासाठी मॉडेल स्कूल ची निर्मिती करण्यात आली आहे, असे मत आदिवासी विकास प्रकल्पाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या भाषणांमधून स्पर्धेचे आयोजनाबाबत कौतुकाची थाप मिळाली आहे. या स्पर्धांमध्ये समूह नृत्य व आदिवासी वाद्द शैली प्रकारात एकलव्य मॉडेल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे विद्यालयाची सर्व स्तरातून स्तुती होत आहे.
ग्रामीण आदिवासी भागासाठी केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या सटाणा येथील एकलव्य मॉडेल स्कूल येथे राज्यातील मॉडेल स्कूल यांचे सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून 37 शाळांचा सहभाग घेण्यात आला होता. यावेळी नृत्य चित्रकला, वक्तृत्व, कथा कथन, पेंटिंग, गायन, लेखन, ड्रामा, वाद्द वादन आदी 16 प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्रस्तरावर जाण्याची संधी मिळणार आहे. यावेळी शाळेच्या स्तरावरून या उपक्रमासाठी मोठी तयारी केलेली असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध स्तरावरील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मॉडेल स्कूलचे प्राचार्य सुरेश देवरे सर यांनी दिली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार दिलीप बोरसे, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, अप्पर आयुक्त तुषार माळी, कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे, उपायुक्त हीतेश विसपुते, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री औचारे आदी उपस्थित होते. तसेच ई. एम. आर. एस. सेल, नाशिक चे सुचेता लासूरे, काजल झाल्टे, अमृता भालेराव, गणेश गोटे हे उपस्थित होते. शाळेचा लौकिक राज्य तसेच देश पातळीवर वाढला असल्या कारणाने देशातील प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. ऑफिसर्स यांनी सुद्धा याच शाळेची अभ्यास दौरा करण्यासाठी निवड केली व शाळेत अभ्यास दौरा करण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थीत। 13 IAS अधिकारी दीक्षा भोरिया,शतन्मयी खन्ना, सुश्री खुंटीया, गौरव यादव,जय यादव, स्वाती शर्मा, मनोज सिंग,अंजली शर्मा,राजबहाद्दूर सिंग मीना(ग्रुप लीडर), विभाकर पाल, सिद्धार्थ शुक्ला, आरंक्षा यादव, गौरव त्रिपाठी इ. आधीकारी या चमूत सामिल होते सर्व अधिकाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल नॅशनल कल्चरल, लिटररी फेस्ट व कला उत्सव 2023 ही राज्य स्तरीय स्पर्धा एकलव्य माॅडेल रासीडेंशिअल स्कूल, अजमेर सौंदाणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत समूह नृत्य व आदिवासी वाद्य शैली प्रकारात एकलव्य माॅडेल रासीडेंशिअल स्कूल, अजमेर सौंदाणे च्या प्रथम क्रमांक पटकवला. या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रजनीकांत चिलुमुल्ला यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण शंकर चौधरी (अधिक्षक) प्रा.अनिल मंगळे, निलेश कुलकर्णी,संतोष जगताप,सारिका घाडगे,वैशाली ताठे, दीपाली पगार,राजू गोळेसर,प्रमोदगिर गोसावी, गणेश गायसमुद्रे, शीतल जाधव,अख्तरखान पठाण, केशव सोनवणे, प्रशांत आहेर, संगीता मोरे (अधिक्षिका), सुरेश पवार , प्रियांका राठोड, रवींद्र बोराडे, नवल पवार,सुनीता बोराडे, प्राचार्य अनिल मंगळे,विनोद कहार,धनराज कामडी, मिताली सूर्यवंशी,चिंतामण जगताप, सिद्धार्थ देवरे, राजेंद्र ठाकरे, स्नेहल शिंदे,पवार सचिन, राहुल राठोड (अधीक्षक) स्वाती पगार (अधिक्षिका), संदीप भांसी क्लर्क प्रकाश सोनवणे, ऋतिक कापडणीस आदींनी मेहनत घेतली.