नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरु करण्यात आहे. त्यांतर्गत महिला पोलीस जंगलात सुरू असलेले हातभट्टीचे अड्डे नेस्तनाबूत करत आहेत. गेल्या तीन आठवड्यांत महिला पोलीसांनी ग्रामीण भागातील 32 अड्डे उद्ध्वस्त केले तर 33 संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, सर्वाधिक कारवाया इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत करण्यात आल्या आहेत. ग्रामीण पोलीसांनी महिला पोलीसांची पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात आठ महिलांचा समावेश करण्यात आला होता. गेल्या तीन आठवड्यांत सदर महिला पोलीसांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील छुपे हातभट्टी अड्डे शोधून एकूण 32 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत तर 33 संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आजवर एकूण 11 लाख 94 हजार 170 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू, रसायन आणि साहित्य साधने हस्तगत करण्यात आली आहे. 33 आरोपींच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.