नाशिक/एनजीएन नेटवर्क
स्वातंत्र्यदिन आणि आचार्य देवनंदी महाराज यांच्या जयंती निमित्त येथील सन्मती आय हॉस्पिटल तसेच अर्थ फाउंडेशनतर्फे डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबिर सन्मती आय हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले होते.
दि. 15 व 16 ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सवलतीच्या दारात आयोजित या शिबिराचा सुमारे ३०० रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती डॉ. मनोज दगडे आणि अर्थ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सोनल दगडे ( कासलीवाल )यांनी यांनी दिली. या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनवर 30 टक्के सवलत देण्यात आली तर केवळ शुल्क ३० मध्ये डोळे तपासणी करण्यात आली.