नाशिक/एनजीएन नेटवर्क
एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर (आयएमएस अॅण्ड आरसी) येथे येत्या ८, ९ व १० सप्टेंबर रोजी सूक्ष्मजीवशास्रावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महामायक्रोकॉन २०२३ असे या परिषदेचे नाव असून या परिषदेसाठी दोनशे पेक्षा अधिक तज्ञ तसेच व्याख्यात्यांची उपस्थिती असणार आहे.
इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीस्टच्या महाराष्ट्र स्टेट चाप्टरची ही 27 वी परिषद आहे. परिषदेच्या एक दिवस आधी ८ सप्टेंबर रोजी प्री कॉन्फरन्स सीएमई आयोजित करण्यात आली आहे. यानंतर दोन दिवसीय परिषदेला ९ सप्टेंबर रोजी सकाळी प्रारंभ होईल. दोन दिवसीय परिषदेसाठी प्रतिजैविक विरोधक : योग्य शोध योग्य उपचार (टॅकलिंग एएमआर : राईट डिटेक्शन, राईट प्रिस्क्रिप्शन) अशी थीम ठेवण्यात आली आहे. दिवसागणिक प्रतिजैविकांना प्रतिसाद मिळणे अवघड होत आहे. तेव्हा या प्रतिजैविकांचा वापर योग्य प्रमाणात होणे आवश्यक आहे. हाच विषय घेऊन या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यादरम्यान सूक्ष्मजीव शास्रातील नवनवीन शोधांचाही आढावा घेतला जाणार असल्याची देण्यात आली आहे.
एसएमबीटीचा सूक्ष्मजीवशास्र विभाग या परिषदेसाठी सज्ज झाला आहे. या परिषदेसाठी तब्बल दोनशेपेक्षा अधिक मान्यवर तज्ञांनी उपस्थिती नोंदवली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरच्या मान्यवरांचा तसेच तज्ञ व्याख्यात्यांचाही समावेश आहे. यामध्ये डॉ. मीना मिश्रा एम्स, नागपूर, डॉ. नवीन कावरे एम्स, भोपाळ, डॉ. छाया चांदे, प्रोफेसर अॅण्ड हेड व्ही. एम. मेडिकल कॉलेज, डॉ अमिता जोशी प्रोफेसर अॅण्ड हेड गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग, डॉ. प्रतिभा नारंग, प्रोफेसर इम्रीटस, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम, डॉ विकास गौतम पीजीआय, चंडीगड, डॉ अरुणा पुजारी, कन्सलटंट ब्रीच कॅन्डी मुंबई यांचा समावेश आहे. परिषदेसाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ हर्षल तांबे, बोर्ड मेंबर श्रीराम कुऱ्हे, डीन डॉ मीनल मोहगांवकर यांच्यासह मान्यवरांनी या परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. परिषदेचे आकर्षण परिषदेसाठी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस इंडियाचे डॉ. व्ही. एम. कटोच यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या परिषदेत दोन सिम्पोझियम, एक हरदास पाठक ओरेशन, प्रेसेडेंशियल ओरेशन, ज्युनियर शास्रज्ञांसाठी पी.एम. खरे पुरस्कार तसेच पेपर आणि पोस्टर्स प्रेझेन्टेशन.
…म्हणूनच एसएमबीटीची निवड
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात निसर्गाच्या सान्निध्यात एसएमबीटी मेडिकल कॉलेज वसलेले आहे. पावसाळ्यातील संततधार पाऊस येथील हिरवाईने नटलेला परिसर यामुळे या आल्हाददायक वातावरणात या परिषदेचे आयोजन झाले आहे.