NGN News
Latest Marathi News

मुख्यमंत्री निधीतून साडेतीन हजार रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची ‘सहायता’

  • विभागातील सात महिन्यांचा आलेख
  • पेपरलेस आणि डिजीटल प्रणाली कार्यान्वित

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आजारपणात सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने नाशिक विभागात अनेकांना मदतीचा हात दिला आहे. गेल्या सात महिन्यांच्या आलेखावर दृष्टीक्षेप टाकला तर साडेतीन हजाराहून अधिक जणांनी योजनेचा लाभ घेतला असून त्याद्वारे ३२ कोटी ३२ लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सदर कक्षामध्ये पेपरलेस आणि डिजीटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या कक्षांची उभारणी करण्यात आल्याने सर्वसामान्यांना त्याचा लाभ होत आहे. ही मदत प्राप्त करण्यासाठी आधारकार्ड, शिधापत्रिका, जिओ-tag छायाचित्र, उत्पन्न दाखला, वैद्यकीय अहवालासह खर्च प्रमाणपत्र, उपचार घेत असलेल्या रुग्णालयाची संगणक प्रणालीवर नोंद आदींची पूर्तता करणे अनिवार्य ठरते.

या २० गंभीर आजारांसाठी मिळते मदत..

दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून एकूण २० गंभीर आजारांसाठी मदत करण्यात येत असल्याची माहिती काशप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. यामध्ये हृदय, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड, नवजात शिशूंचे आजार, बालक शस्त्रक्रिया, भाजलेले आणि विद्युत अपघातग्रस्त. बोनम्यारो प्रत्यारोपण आदी आजारांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी १८००-१२३२२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.