गंगटोक/एनजीएन नेटवर्क
उत्तर सिक्कीमच्या लाचेन आणि लाचुग भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्ता बंद झाल्यामुळे 60 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 2400 हून अधिक पर्यटक अडकले आहेत.
प्रशासनाच्या माहितीनुसार, अडकलेल्या 2464 पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 19 बस आणि 70 छोटी वाहने तैनात केली आहेत. ते म्हणाले की, आतापर्यंत 123 पर्यटकांना घेऊन तीन बस आणि दोन अन्य वाहने राज्याची राजधानी गंगटोककडे रवाना झाली आहेत. दरम्यान, चुंगथांगकडे जाणारा रस्ता अनेक ठिकाणी बंद आहे. पाऊस थांबल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू होईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर सिक्कीम जिल्हा प्रशासनाने अडकलेल्या प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत.