NGN News
Latest Marathi News

आ. तांबे यांच्या निधीतून सिन्नर तालुक्यातील २२ शाळांना पोडियमचे वितरण

** संतोष बिरे

वावी : एनजीएन न्यूज नेटवर्क

विधान परिषद नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून सिन्नर तालुक्यातील २२ विविध शाळांना सांस्कृतिक मंच पोडियमचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील महात्मा फुले विद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील शाळांना मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना एस. बी. देशमुख म्हणाले की, “शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा निधी मिळवणे आणि त्याचा योग्य विनियोग करणे आवश्यक असते. आ. तांबे यांनी शाळांची मागणी लक्षात घेऊन त्वरित हा निधी उपलब्ध करून दिला. ही अत्यंत भूषणावह बाब आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अशा साहित्याची मोठी मदत होत असल्याचे सांगितले. पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या निधीतून आतापर्यंत नाशिक विभागात कॉम्प्युटर, प्रोजेक्टर, वाचनालयासाठी पुस्तके आणि वर्गखोल्या देऊन शालेय गुणवत्ता वाढीसाठी मोठी मदत केली आहे. माजी आमदार सुधीर तांबे यांचा वारसा पुढे नेत सत्यजित तांबे शिक्षकांच्या समस्या विधानभवनात हिरीरीने मांडत असल्याने, शिक्षक वर्गात त्यांची ओळख ‘शिक्षकांचे आमदार’ म्हणून होत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर सिन्नर तालुक्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.