- जिल्हास्तरीय स्पर्धांचे उदघाटन
- वेस्टर्न ग्रुप सॉंग, एकपात्री प्रयोग व समूहनृत्यांनी वेधले लक्ष
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या ‘मविप्र सांस्कृतिक महोत्सव २०२५’ च्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या 22 शाळांनी सहभाग नोंदवत वेस्टर्न ग्रुप सॉंग, एकपात्री प्रयोग व समूहनृत्य यांचे सादरीकरण केले.
उदघाटनप्रसंगी मविप्र नाशिक तालुका संचालक लक्ष्मण लांडगे, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव, मविप्र सेवक संचालक सी. डी. शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्करराव ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. कैलास शिंदे, डॉ. विलास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकामधून शिक्षणाधिकारी डॉ. ढोके यांनी प्रास्ताविक केले. यात ते म्हणाले, संस्थेच्या विविध शाखांमध्ये असणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने या स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत. या वर्षी नव्याने सुरु करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवातून विविध कलाकार मोठया पडद्यावर दिसतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. सेवक संचालक सी. डी. शिंदे यांनी २००८ ला सुरु झालेली स्पर्धा आता बहरास आल्याचे मत व्यक्त केले. वेस्टर्न ग्रुप स्पर्धेचे परीक्षण नरेंद्र पुली व रसिका जानोरकर यांनी, एकपात्री प्रयोग स्पर्धेचे परीक्षण राजेश शर्मा व लक्ष्मी पिंपळे यांनी तर समूहनृत्य स्पर्धेचे परीक्षण शुभांगी साळवे व श्रीकांत वाखारकर यांनी केले. सविता जाधव व योगेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. मविप्र स्वरब्रम्हा संगीत निकेतनचे प्रमुख आनंद अत्रे व प्रशांत महाबळ यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला
——–
@ दि. 20, 21, 22 नोव्हेंबर रोजी संस्थेच्या विविध शाखांमध्ये तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. त्या स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकप्राप्त संघ जिल्हास्तरीय स्पर्धांकरीता पात्र ठरले. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा तीन गटांमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लघुनाटिका, एकपात्री प्रयोग, लोकगीत व समूहनृत्य या गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
Comments are closed.