NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

वीस राज्यांमध्ये पावसाचे धुमशान.. तब्बल 22 राज्यांत रेड अलर्ट !

0

 नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

देशातील 20 राज्यांमध्ये सध्या पावसाचे धुमशान सुरु आहे. हिमाचल, पंजाबसारख्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 15 वर्षांत दिल्लीत जुलैमध्ये एवढा पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे 22 जुलैपासून तेलंगणामध्ये पावसामुळे आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात पावसाची संततधार सुरू असून गुरुवारीही अधूनमधून पाऊस सुरूच होता. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून रस्ते आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र-तेलंगणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये 28 जुलै पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच दिल्लीत यमुनेचे पाणी पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीवरून 205.83 वर पोहोचले आहे. हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, उत्तराखंडपासून ते तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेशपर्यंत मुसळधार पावसाचे कोसळत आहे. त्याचबरोबर देशातील 32 टक्के जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार मणिपूर, झारखंड आणि बिहार या जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 27 जुलै दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, शेजारील ठाणे, रायगडसह संपूर्ण राज्यात पाऊस पडत आहे. दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.