सुरत/एनजीएन नेटवर्क
अवघ्या 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने 23 वर्षीय युवकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. इस्माइल उर्फ इस्माइल यूसुफ हाजात असे 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश शकुंतला सोळंकी यांनी 31 जुलै रोजी इस्माइल उर्फ इस्माइल यूसुफ हाजात याला दोषी ठरवले होते. आज फाशीची शिक्षा सुनवाली आहे. त्याशिवाय पीडित कुटुंबाला 10 लाख रुपये देण्याचा आदेश दिलाय.
गुजरातमधील सुरत येथील स्पेशल कोर्टात इस्माइल उर्फ इस्माइल यूसुफ हाजात याच्याविरोधात सुनावणी झाली. 20 महिन्यांच्या चिमुकीलचा बलात्कार केल्याचा आरोप इस्माइल याच्याविरोधात होता. फेब्रुवारी महिन्यातील हे प्रकरण आहे. 23 वर्षीय इस्माइल याला सोमवारी 31 जुलै रोजी कोर्टाने दोषी ठरवले. भादवि कलम 302 (हत्या), 376 एबी (12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार, न्यायाधीश शकुंतला सोळंकी यांनी इस्माइल याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची दखल घेत आरोपीला 10 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. वकील नयन सुखदवाला यांनी सांगितले की, 20 महिन्यांच्या चिमुकलीच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. तसेच पोटावर चावा घेतल्याच्या खुणा होत्या.